चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामने 23, 24 व 25 डिसेंबरला अमरावती बायपास, मेट कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे.
उद्या शनिवारपासुन (ता. 23) सुरू होत असलेल्या खुल्या सामन्यामध्ये प्रथम पारितोषीक नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टु सुर्यवंशी व उपाध्यक्ष देवानंद खुणे यांच्यातर्फे दहा हजार एक रूपये, व्दितीय पारितोषीक नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांच्यातर्फे सहा हजार एक रूपये व तृतीय पारितोषीक नगरसेवक वैभव गायकवाड, टी. एस. ग्रुपतर्फे तीन हजार एक रूपये देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट मॅन ऑफ दि मॅच, बेस्ट मॅन ऑफ दि सिरिज, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट किपर, बेस्ट बॅस्टमन, बेस्ट फिल्डर, सिक्स सिक्सेस यांना वैयक्तीक बक्षीस म्हणुन ट्रॉफी देण्यात येणार आहे. सदर सामन्यांमध्ये खेळण्याची प्रवेश फी तीनशे एक्कावन रूपये आहे. शनिवारपासुन सुरू होणाऱ्या सामन्यांचे उद्घाटन नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते पार पडणार असुन प्रमुख पाहुने म्हणुन न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेविका सौ. स्वाती मेटे, नगरसेवक वैभव गायकवाड, बांधकाम सभापती महेश कलावटे, शिक्षण व आरोग्य सभापती सतपाल वरठे, महिला व बालकल्याण सभापती शबाना परविन अब्दुल हमिद आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
तरी परीसरातील जास्तीत जास्त खेळाडुंनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ‘दि ग्रेट टिपु सुलतान’ ग्रुपचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ, उपाध्यक्ष मोहम्मद इम्रान, सचिव इम्रान सौदागर, कोषाध्यक्ष युसुफ सौदागर, सहसचिव मोहम्मद दानिश, सदस्य सैय्यद जाहीद, राजिक कुरैशी, मोहसीन खान, मुख्तार शाह, गुलफाम शाह, सैय्यद उमेर, मोहम्मद नदीम, शेख आसीफ, मोहम्मद जुबेर, शेख इरशाद, काझी इस्लाम, कासिम कुरैशी, नवाज कुरैशी, अशरफ अली, अब्दुल्ला कुरैशी, शोएब बैग, मोहम्मद जुनैद आदींनी केले आहे.