चांदूर रेल्वे आयटीआयची कबड्डीमध्ये राज्यस्तरावर निवड – विभागीय स्तरावर अकोला टीमला केले पराभुत

326
जाहिरात

औरंगाबादला अमरावती जिल्ह्याचे करणार प्रतिनिधीत्व

 

चांदूर रेल्वे –

तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला अमरावती आयटीआय च्या भव्य प्रांगणात उत्साहाने ८ जानेवारीला सुरुवात झाली होती. या विभागीय स्पर्धेत कबड्डीमध्ये जिल्हास्तरावर जिंकुन अमरावती जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करणाऱ्या चांदूर रेल्वे आयटीआयच्या टीमने अकोला जिल्ह्याच्या टीमला गुरूवारी (ता. ९) पराभुत करून पुन्हा एकदा विजयी झाली आहे. त्यामुळे आता चांदूर रेल्वेची चमु औरंगाबाद येथे राज्यस्तरावर अमरावती जिल्ह्याचे कबड्डीमध्ये प्रतिनिधीत्व करणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बऱ्याच वर्षानंतर यंदा खेळ व तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्याचे ठरविले होते. त्यामध्ये सर्वप्रथम संस्थास्तरावर व नंतर अमरावती येथे जिल्हास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजयी चमु व प्रशिक्षणार्थ्यांची निवड विभाग स्तरावर करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अमरावती विभागाचे सहसंचालक एस. एस. उमाळे यांच्या हस्ते पार पडले. या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनपर समारंभात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, यवतमाळ डी.वी.ओ. बुटले मॅडम, सहाय्यक संचालक विकास शिरभाते, अनिल रेड्डीवार, नरेंद्र येते, अकोल्याचे प्राचार्य बंडगर आदींची उपस्थिती होती. या विभागातील अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम व अमरावती येथील आय.टी.आय. चे शेकडो खेळाडू उत्साहाने या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये कबड्डीचा गुरूवारी निकाल लागला असुन विभागस्तरावर सुध्दा चांदूर रेल्वे आयटीआयची चमु अजिंक्य ठरली आहे. तर अकोलाची चमु उपविजेता ठरली. कबड्डीच्या चमुमध्ये क्षितीज चिकटे, प्रज्वल घाटोळे, तेजस देशमुख, केतन ठाकरे, गुलशन राठोड, आकाश मेहर, ओम शेलार, रोहन हुडमे, शुभम गोळे यांचा समावेश होता. या विजयी चमुसोबत व्यवस्थापक म्हणुन पी. डी. पाचपोर तर प्रशिक्षक म्हणुन सुमित वलीवकर व शहजाद खान यांनी यशस्वीरित्या भुमिका पार पाडली. प्रशिक्षणार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे चांदूर रेल्वे आयटीआयचे प्राचार्य एस. एस. पाटबागे, गटनिदेशक डि.टी. शिंगणे, शिल्प निदेशक एच. यु. चांदुरकर, एन. एन. वसुले, के. के. सिसोदे, मारोती मर्दाने, पी. डी. पाचपोर, डी. एन. दहापुते, एस. एन. ठाकरे, कैलास चौधरी, कु. जे. के. रंगारी, शहजाद खान, सुरज चांदूरकर, एस. टी. बेहेरे, सुमीत वलीवकर, गजानन भडांगे,  भुषण खेडकर, प्रशांत टांगले, एल. पी. शेलोकार, एस. एस. कांबळे, एस. व्ही. निमकंडे, कर्मचारी सौ. आत्राम, नंदकिशोर शेळके, राठोड, कनोजे, सारवाण, पाटील,  वाघमारे, सावंत, मोहोड आदींनी कौतुक केले आहे.

 

रनिंगमध्येही राज्यस्तरावर

१०० मिटर रनिंग स्पर्धेमध्ये चांदूर रेल्वे आयटीआयचा वायरमन ट्रेडचा प्रशिक्षणार्थी तेजस देशमुख याने विभागीय स्तरावर विजयी होऊन औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरासाठी आपली जागा पक्की केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।