अवैध रेती वाहतुकीची १०  वाहने पकडली,२ लाख ५०  हजार दंड

0
873
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण – बुलढाणा –

बुलडाणा :- शेगाव आणि बाळापूर तालुक्यातील मन आणि पूर्णता नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्‍या १० वाहनांना मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईत पकडण्यात आले. या वाहनधारकांकडूनअडीच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

शेगाव तालुक्यातील पूर्णता नदी आणि बाळापूर तालुक्यातील मन नदीपात्रात बर्‍याच दिवसांपासून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाहतूक सर्रास सुरू होती. महसूल विभागाने कारवाई करण्यापूर्वीच सदर वाहने घटनास्थळाहून पलायन करण्यात पटाईत होते. ही बाब लक्षात ठेवून शेगावचे तहसीलदार गणेश पवार यांनी एकपथक तयार करून विभागाने सापळा रचण्याचे सांगितले. त्यानुसार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या ताफ्यासह रविवारी आणि सोमवारी नदीपात्रात पोहोचले. त्याठिकाणी टॅक्टर, टिप्पर अशा एकूण १० वाहने तब्यत घेतली. त्यानंतर सदर वाहने तहसील कार्यालयात आणण्यात आली. तहसील कार्यालयात ही वाहने आणल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाकडील रॉयल्टीची चौकशी करण्यात आली. रॉयल्टी मिळालेली नाही म्हणून वाहनधारकाकडून एकूण अडीच लाखाचा दंड वसूल करण्यात आला. या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.