*सार्वजनिक गणेश महोत्सव 2017 अंतर्गत सामाजिक सुरक्षा व सद्भावना चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न*

0
1114
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले –

सामाजिक सुरक्षा व सदभावना चषक स्पर्धेचे आयोजन सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत 2017 मध्ये घेण्यात आले होते.यामध्ये ग्रामीण व शहरी जवळपास 17 गणेश मंडळींना सहभाग नोंदवला या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज पोलिस स्टेशन परिसरात संपन्न झाले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष थानेदार अभिजित अहिरराव प्रमुख अतिथी रमाकांत शेरेकर,अब्दुल राजीक शेख हारूण,राजेश वानखडे,विजय वार्जुरकर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक-श्रीराम बाल गणेश मंडळ बोपापूर 11001 रोख रुपये व प्रमाणपत्र स्व नारायणराव वानखडे स्मृती प्रीत्यर्थ राजेश वानखडे श्री गजानन हार्डवेअर गांधीपुल यांचे कडून द्वितीय क्रमांक-बालमीत्र गणेश मंडळ कुंभारवाडा,बालमित्र गुरूदेव गणेश मंडळ सरमसपूरा यांना रमाकांत शेरेकर व विजय पिंपळकर प्रत्येकी 5001 रुपये व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक -अब्दुल राजीक शेख हारूण तंटामुक्ती अध्यक्ष तळेगाव मोहना यांचे कडून 3001रूपये व प्रमाणपत्र आदर्श बाल गणेश मंडळ रायपूरा यांना देण्यात आले तसेच
प्रोत्साहन पर प्रत्येकी 501रूपये नृसिंह गणेश मंडळ बोरीयापूरा,आरती गणेश मंडळ अब्बासपूरा,विर शिवाजी गणेश मंडळ अब्बासपूरा यांना थानेदार अहिररावसाहेब,रवी रेवतकर व पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रमाकांत शेरकार,हरीश्चंद्र वानखडे,देविदासजी घुलक्षे,विजय वार्जुरकर,अँड.घाटेवार,गजानन ढवळे,निकेश दाभाळे,निळकंठ पाटील,प्रफुल्ल कुकडे,विलास केचे व प्रमोद नैकेले यांनी तर पोलीस स्टेशनचे कर्मचारीनरेश धाकडे,गणेश बेलोकार,देवीदास खंडारे पि.एस.आय,पंकज ठाकरे,घणश्याम कीरोले,दिपक राऊत,प्रविण मेशकर यांनी अथक परिश्रम केले.कार्यक्रमात मार्गदर्शन रमाकांत शेरकार व थानेदार अहिरराव यांनी संचलन घुलक्षेसर व आभार प्रदर्शन प्रफुल्ल कुकडे यांनी केले.कार्यक्रमाला सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.