आजचे दैनिक पंचांग —  २५ डिसेंबर २०१७

0
1081
Google search engine
Google search engine

दिनांक २५ डिसेंबर २०१७
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* पौष ०३ शके १९३९
*शुक्र अस्त चालू आहे*
पृथ्वीवर अग्निवास २१:०५ नंतर.
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०७
☀ *सूर्यास्त* -१८:०१

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -दक्षिणायन
*ऋतु* -हेमंत (सौर)
*मास* -पौष
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -सप्तमी
*वार* -सोमवार
*नक्षत्र* -पू.भाद्र.
*योग* -व्यतिपात
*करण* -गरज (०८:५९ नंतर वणिज)
*चंद्र रास* -कुंभ (१४:२८ नंतर मीन)
*सूर्य रास* -धनु
*गुरु रास* -तुळ
*राहु काळ* -०७:३० ते ०९:००

*विशेष* -मृत्यूयोग २१:०५ पर्यंत नंतर भद्रा,गुरुगोविंदसिंह जयंती,ख्रिसमस
या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“सों सोमाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गाईचे दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

विशेष टीप– दि.०९ डिसेंबर २०१७ ते दि.०९ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शुक्रास्त कालावधी असल्यामुळे ह्या काळात विवाह-उपनयन-वास्तुशांती इत्यादी विशेष व काम्य अशी कोणतीही धार्मिक कार्ये करु नयेत.ही सर्व कार्ये ह्या काळात केली असता फलद्रुप होत नाहीत असे धर्मशास्त्र सांगते.ह्याची विशेष नोंद सर्वांनी घ्यावी.

टीप – सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास ते सकाळी ११.१० ते दु.१२.३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी आवळा खावू नये.
या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.