स्व. डॉ. ढोलेंच्या स्मारकासाठी ५१ हजार रूपये वर्गणी देणार – खा. रामदास तडस <><> रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

0
613
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले हे एक लोकनेते होते. त्यांनी समाजाबरोबल ओबीसींना न्याय मिळवुन दिला. ओबीसींच्या समस्या आमदार असतांनी सातत्याने विधानसभेत सोडविण्याचा प्रयत्न केला. आज स्व. डॉ. ढोले आपल्यामध्ये नाहीत. परंतु त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यामुळे त्यांचे शहरात स्मारक व्हावे अशी माझी व सगळ्यांची इच्छा आहे. लोकवर्गनीतुन स्मारक बांधावे व त्यात सर्वप्रथम ५१ हजार रूपये मी वर्गणी देणार असे वक्तव्य वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केले. ते संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्य आयोजित स्व. डॉ. पांडुरंग ढोले स्मृतीप्रित्यर्थ रूग्णवाहिका सोहळ्यात बोलत होते.
खा. तडस पुढे बोलतांना म्हणाले की, स्व. डॉ. ढोलेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्र डॉ. क्रांतीसागर ढोले यांनी रूग्णवाहिकेचा जो शब्द दिला होता तो त्यांनी आज पाळला आहे. स्व. डॉ. पांडुरंग ढोले असे व्यक्तिमत्व होते कि ज्यांनी आमदारकीचा सर्व उपयोग समाजासाठी, गोरगरीबांसाठी व ओबीसींसाठी लढण्यासाठी केला. अशा लोकनेत्याचं चांदुर रेल्वे शहरात स्मारक व्हावं आणि समाजाला एक दिशा दिसावी. यासाठी सर्वप्रथम पाच ते सहा लोकांची एक स्व. डॉ. ढोले स्मारक समिती नेमावी. व त्यानंतर लोकवर्गनीतुन स्व. डॉ. ढोलेंचं स्मारक शहरात बांधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मी ५१ हजार रूपये वर्गनी समितीला देणार असुन सर्व समाज बांधवांनी सुध्दा लोकवर्गनीतुन यासाठी हातभार लावावा व स्मारक बांधणीला लवकरच सुरूवात व्हावी अशी भावना खासदार तडस यांनी व्यक्त केली तसेच जागेसाठी स्थानिक नगर परीषदेला विनंती करून ओपन स्पेस जागेचा ठराव घेण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी म्हटले.  यानंतर माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्व. डॉ. पांडुरंग ढोले साहेबांची याठिकाणी उणीव भासत आहे. त्यांनी केलेले कार्य आमच्या मनात नेहमीसाठी राहिल. त्यांनी राजकीय क्षेत्रापेक्षाही सामाजिक व गोरगरीब जनतेसाठी कार्य केलं. त्यांच्या कार्याची सर्वांनी प्रेरणा घेतली तरच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

सर्वशाखीय तेली समाज संघटनेच्या वतीने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम सोमवारी स्थानिक संताबाई यादव सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते तर प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी मंत्री जगदिश गुप्ता, माजी खासदार सुरेश वाघमारे, यवतमाळ माजी जि. प. अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, माजी जि. प. उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, तैलिक समिती अध्यक्ष मधुकर सव्वालाखे, प्राचार्य प्रा. डॉ. जयंत कारमोरे, डॉ. क्रांतीसागर ढोले, खगोल अभ्यासक विजय गिरोळकर, मांजरखेड सरपंच दिलीपराव गुल्हाने, चैताली झाडे, अलकाताई पांडुरंग ढोले, आशुतोष गुल्हाने, साकुरे, मदनकर महाराज आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ढोले परीवारातर्फे गोरगरीबांच्या सेवेसाठी रूग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा खासदार रामदास तडस यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी दोन मिनीटे मौन बाळगुन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी स्व. डॉ. ढोले यांचे पुत्र डॉ. क्रांतीसागर ढोले यांनी ही रूग्णवाहिका गोरगरीबांच्या सेवेसाठी अल्पदरात सगळ्यांसाठी उपलब्ध असुन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यानंतर  कार्यक्रमात विजय गिरोळकर, दिलीप गुल्हाने, चैताली झाडे यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सकाळी मदनकर महाराज यांचे काल्याचे किर्तन सकाळी झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडु आंबटकर यांनी तर आभार प्रदर्शन केशव वंजारी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन उज्वला गुंडापुरे व धनश्री श्रीराव यांनी केले.
यावेळी तेली बांधवांसह स्व. डॉ. ढोले यांचे कार्यकर्ते व मित्रगणसुध्दा प्रामुख्याने उपस्थित होते.