संग्रामपुर तालुक्यातील कपाशी बोंडअळी नुकसानीची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा- संग्रामपुर तालुका स्वाभिमानी चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
1177
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण ,संग्रामपुर ,बुलडाणा

बुलडाणा :- संग्रामपुर तालुक्यातील कपाशी बोंडअळी नुकसानीची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे संग्रामपुर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 26 डिसेंबर रोजी संग्रामपुर तहसिलदार मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमुद की , संग्रामपुर तालुक्यातील कपाशीवर मोठया प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव व धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. जाहिर झालेली आर्थिक मदत 1 महिन्याचा आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी . ज्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष बियाणे खरेदीचे बिल उपलब्ध नसेल, तरी प्रत्यक्ष पेरणीक्षेत्राचा पंचनामा करुन मदत दयावी , दाळवर्गीय पिके,उडीद,मुग,सोयाबीन व तुर हया पिकाला उशीरा पावसाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट दिसुन येत असून खर्च निघणे ही अशक्य़ आहे. केंद्र सरकारचे हमी भावाने खरेदी करतांना गुणवत्तेच्या जाचक अटी शिथील करुन केवळ साफ केलेला शेतमाल हमीदराने एकरी 4 क्विंटल पर्यंत उत्पादन गृहीत धरुन खरेदी करावा, तुर पिकावरही संकट आले असुन कापणीपुर्वीच 50% पेक्षा जास्त़ मररोगाने तुर वाळुन नष्ट़ झाली आहे . तुर पिकाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन तुर उत्पादनात घट झाल्याने तुर उत्पादन शेतकऱ्यांनाही बी.टी.कॉटन प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी .

तसेच राज्यातील मराठवा़डा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून या सर्वेक्षणाचा अहवालानंतर बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानाची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत अधिकारी यांची राहिल अशा प्रकारचे निवेदन तहसिलदार राठोड यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे सादर करण्यात आले आहे यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, स्वा.विद्यार्थी संघटनाचे तालुकाध्यक्ष राहुल पाखरे, युवा नेते गणेश मानखैर ,युवा नेते विठठल पाटील ,स्वा.वि.संघटना उपाध्यक्ष सौरभ बावस्कार , युवा नेते गणेश वहीतकार ,सुधाकर गोल्ह़र यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते