संग्रामपुर तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी श्री शिवकुमारजी चांडक यांची अविरोध निवड

0
509
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण,बुलडाणा –

बुलडाणा :- संग्रामपुर
तालुकयातील पातुर्डा येथील दि २६ डिसें रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात तालुका स्तरीय ग्रंथालय संघाच्या समस्त सदस्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली सदर बैठकीत सरस्वती वाचनालयचे जेष्ट संचालक सामाजीक कार्यकतै शिवकुमारजी चांडक हयांची सलग तिसऱ्यादा तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी सर्वाच्या समन्वयातुन सर्वानुमते फेर निवड करण्यात आली हया निवडी नंतर आनंद व्यकत करतांना चांडक यांनी ग्रंथालय व वाचन चळवळ हया बद्दल व्यापक जनजागृती करण्यासाठी स्वता जातीने लक्ष देणार असल्याची गवाही याप्रसंगी दिली सदर बैठकीत तालुका ग्रंथालय संघाच्या उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी धमैद्र इंगळे, सचिव श्याम इंगळे, कोषाध्यक्षपदी हिंम्मतराव देशमुख, हयांची निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारणी सदस्य म्हणुन विनायक राउत , रमेश पिंजरकार, अजय सपकाळ, विनायक चोपडे, शरद बनकर, पंकज गोमासे, विठठल बाजोड, भिमराव पवार, मंगेश पुंडे, प्रकाश अरबट, श्रीकांत चवरे हयांची सुध्दा एकमताने निवड करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती वाचनालयचे अध्यक्ष पुरूषोत्तमजी सेवक हे होते
सदर कार्यक्रमाला जेष्ठ संचालक ऊत्तमराव तायडे, नारायण दांडगे, रामेश्वर गायकी,ग्रंथपाल अनंत सातव, गजानन राजनकार, निखील भाकरे व जिल्हा तथा तालुका ग्रंथालय संघाचे सदस्य बहुसंख्याने उपस्थीत होते