न. प. उपाध्यक्ष खुणे यांनी दिली तिनचाकी सायलक भेट प्रजासत्तादिनाचे औचित्य

0
619
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन स्थानिक नगर परीषदेचे उपाध्यक्ष देवानंद खुणे यांनी एका अपंगाला स्वखर्चाने तिनचाकी सायकल भेट स्वरूपात दिली.
   शहरातील रहिवासी महादेव रमेशराव मेश्राम हे अपंग असुन त्यांच्याजवळ तिनचाकी सायकल नव्हती. याचीच दखल देघुन न. प. उपाध्यक्ष देवानंद खुणे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन नगर परीषदेत महादेव मेश्राम यांनी तिनचाकी सायकल भेट स्वरूपात दिली. यावेळी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, न. प. अभियंता शैलेंद्र मेटे यांच्यासह सर्व नगरसेवक, शहरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.