अहेरी येथील युवा पत्रकार व दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या रेपाकवार यांचे  दुःखत निधन

0
1202
Google search engine
Google search engine

विशेष प्रतिनिधी-सावंगी मेघे / गडचिरोली :

अहेरी येथील युवा पत्रकार तसेच अगदी सुरवातीला विदर्भ 24 न्यूज ला देखील बातम्या पाठवणारे तसेच दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या रेपाकवार यांचे वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील रूग्णालयात आज दुःखद निधन झाले आहे
पत्रकार रंगय्या रेवाकवार हे मागिल काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सावंगी मेघे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज २९ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

एक धळपळीचा पत्रकार निघून गेला; कधीही भरून न निघणारी पोकळी…..

रंगय्या रेपाकवार यांनी पत्रकारीतेत उत्कृष्ट प्रतिमा निर्माण केली होती. युवा, तडफदार व मनमिळावू पत्रकार म्हणून त्यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख होती. शासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करून सर्वच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिशय प्रेमळ स्वभाव समोरच्यासोबत बोलताना नेहमी सन्मानजनक पने बोलणार रंगय्या आता आपल्यात नाही ….. भावपूर्ण श्रद्धांजली