*फार्मसी कॉलेजच्या एन एस एस मध्ये मोफत तपासणी शिबीराला प्रचंड प्रतिसाद*

0
638
Google search engine
Google search engine

रिसोड (रुपेश बाजड):-

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती शी संलग्नीत महिलां उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोड द्वारा संचालित कॉलेज ऑफ फार्मसी पुंडलिक नगर देगांव च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस)पथकाद्वारे विशेष निवासी श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन दि २६ जानेवारीला थाटात संपन्न झाले.रिसोड तालुक्यातील ग्राम मोहजा इंगोले येथे २६ जानेवारी ते २ फेब्रुवरी चालणाऱ्या शिबिराला आज दिनांक 28 जानेवारीला मोफत ह्दय रोग रक्तदाब व मधुमेह शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये तज्ञ डॉ गोपाल ठाकरे एम बी बी एस अपोलो हॉस्पिटल हेद्राबाद.ठाकरे कार्डियाक सेन्टर वाशिम यांनी सहभाग घेतला तरी या शिभिरामध्ये अनेक रुग्णांनी सहभाग घेऊन याचा लाभ घेतला.