चांदुर रेल्वे येथे गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव आजपासुन-श्री विठ्ठल वारकरी सेवा मंडळ, बहुउद्देशीय संस्था, एकपाळाचे आयोजन

0
939
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
श्री विठ्ठल वारकरी सेवा मंडळ, बहुउद्देशीय संस्था  एकपाळाच्या वतीने आज दिनांक ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवा सोबतच अखंड हरिनाम सप्ताह शहरातील पात्रीकर कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेला आहे.
      यामध्ये आज ३१ जानेवारीला सकाळी ८ वाजता निंभा येथील श्री सौ. मालाताई शरदराव झाडे यांच्या शुभहस्ते, ८.३० वाजता विणापुजन व दिपप्रज्वलन अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजीत पाटील ढेपे यांच्या हस्ते, ९ वाजता हनुमान मूर्तीचा अभिषेक सौ. सुनंदाताई अशोकराव बोंडे यांच्या हस्ते, १० ते १२ वाजता श्री संत गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा शुभारंभ वायगांव येथील विकास इंगोले, सौ. स्वातीताई शैलेंद्र मेटे यांच्याहस्ते होणार आहे. ३ फेब्रुवारीला रात्री ८ ते १० वाजता प्रमोद महाराज जोशी,अमरावती यांचा कीर्तन कार्यक्रम, ४ फेब्रुवारीला शालीकराम महाराज खेडकर यांचा कीर्तन कार्यक्रम, ५ फेब्रुवारीला सायंकाळी ५ ते ६ वाजता श्री माऊली महाराज दर्शन सोहळा (मुंगसाजी दरबार, गोपाल नगर अमरावती), रात्री ८ ते १० महाराष्ट्र वारकरी महामंडळ विदर्भाचे प्रांताध्यक्ष ह-भ-प विठ्ठल महाराज साबळे यांचे कीर्तन, ६ फेब्रुवारीला महाराष्ट्र वारकरी महामंडळ अमरावतीचे जिल्हाध्यक्ष ह-भ-प. प्रा. शामबाबा निचीत यांचे हरिकीर्तन, ७ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ९ श्रीं चे फोटो पूजन व हनुमानजींचा अभिषेक शैलेंद्र मेटे, सहपरिवार यांचे शुभहस्ते, सकाळी ११ ते १ गोपालकाल्याचे कीर्तन ह भ प धोंडुपंत महाराज यांच्या हस्ते, दुपारी १ ते ४ वाजता श्रीं चा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे. या सप्ताहात संजय कामनापुरे, नलिनीताई रवींद्र काळमेघ, सुनंदा बोंडे, विनोदराव काळमेघ, अश्विनीताई कामनापुरे, मालाताई झाडे, प्रमोद देशमुख, सुरेखाताई गुल्हाने, वंदनाताई वाढोणकर, श्रीराम वानखडे, मोहिनीताई राऊत, अर्पणाताई जगताप, वनिता राऊत, वंदनाताई पिंपळे, कल्पनाताई राजुरकर, मंदा परडखे, अरूणा डुबे, वैशाली कदम, सुरेखा मारबदे, शुभांगी तितरे, स्वाती मेटे हे दैनिक अन्नदान करणार आहे. तर ७ फेब्रुवारीला डॉ. पंजाबराव मेटे, विनोद काळमेघ,  मालाताई झाडे, बंडुभाऊ यादव, हर्षाताई काळमेघ यांच्यातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
      तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमात तनमनधनाने सहभाग दर्शवुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतारामजी काळमेघ, रविंद्र काळमेघ (एकपाळा) आदींनी केले आहे.