माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांची जयंती शहरात साजरी – जनता दल (से.) कार्यकर्ते व मित्रमंडळींचे आयोजन

0
674
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    शेतकरी, शेतमजुरांचे कैवारी , गोरगरीब दीन दलित, सर्व सर्वसामान्य जनतेचे नेते, ओबीसी स्कॉलरशीपचे शिल्पकार, जनता दल सेक्युलरचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांची जयंती शुक्रवारी (ता. २) शहरातील ढोले कॉम्पलेक्समधील जनता दल (से.) कार्यालयात कार्यकर्ते व मित्रपरिवाराच्या वतीने साजरी करण्यात आली.
    यावेळी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात डॉ. क्रांतिसागर पांडुरंग ढोले यांनी स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांच्या प्रतिमेचे पुजन, हारार्पण करून अभिवादन केले. यानंतर जनता दलाच्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व मित्रपरीवारांनी सुध्दा प्रतिमेचे पुजन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी सुरू केलेली चळवळ पुढेही चालु ठेवण्याविषयी चर्चा केली. स्व. डॉ. ढोले यांनी शेतकरी, शेतमजुर, गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य आणि संघर्ष हे आपण कधीही विसरू शकत नाही, असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यानंतर याच कार्यक्रमात तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) येथील जनता दल (से.) चे युवा कार्यकर्ते स्व. विलास हेरोडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
      या कार्यक्रमाला डॉ. क्रांतिसागर ढोले, सुधीर सव्वालाखे, प्रमोद बिजवे, संजय डगवार, अंबादास हरणे, शंकरराव आंबटकर, साहेबराव शेळके, आपचे नितीन गवळी, रामचंद्र हटवार, अवधुत सोनवने, रामकृष्ण पडधान, भिमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, मेहमुद हुसैन, अशोकराव हांडे, रमेशराव गुल्हाने, सुनिल हुमने, देविदास शेबे, गजानन शहाडे, श्री. भगत, शेषरावजी जांभुळकर, शोभाबाई मुनकर, मारोती काळे, पुंडलीकराव पत्रे, वासुदेव गुल्हाने यांसह अनेक कार्यकर्ते, मित्रगण उपस्थित होते.