बजेट मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसली-: आमदार ऍड यशोमती ठाकूर >< तिवसा येथे शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ

0
643
Google search engine
Google search engine

तिवसा:- हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार नाही, अर्थसंकल्प बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली नसून शेतकऱ्यांची होत असलेली बिकट अवस्था पाहून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणं अपेक्षित होत मात्र बजेट मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.

आज तिवसा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी शासकीय आधारभूत भावाने तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर कार्यक्रमाच्या उदघाटन म्हणून बोलत होत्या यावेळी रीतसर वजन काट्याचे पूजन करून पहिला मान म्हणून पंकज वानखडे रा.सार्शी या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक श्री सुरेश साबळे,माजी समाज कल्याण सभापती श्री दिलीपराव काळबांडे,काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकुंद देशमुख, नगरपंचायत उपाध्यक्ष श्री वैभव वानखडे,जि.प.सदस्य अभिजित बोके,जिल्हा मार्केटिंग अधिकारी पाटील,पंचायत समिती उपसभापती लोकेश केने,गजानन अडसपुरे,सदस्य रंजना पोजगे,बाजार समितीच्या सचिव ज्योती रोंगे,सभापती रामराव तांबेकर,बाजार समिती उपसभापती कमलाकर वाघ, प स सदस्य श्याम देशमुख, सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी याला उत्फुर्त असा प्रतिसाद देत आपली तूर विक्रीसाठी आणली होती.