कोरेगाव-भीमा येथील हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी !- अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधिज्ञ परिषद

0
899
Google search engine
Google search engine

पुसद (यवतमाळ) येथील धर्मसभेला ५ सहस्र हिंदूंची उपस्थिती

 

पुसद (यवतमाळ)– या देशात आतंकवाद्यांचा प्रतिकार करणार्‍यांवर खटले प्रविष्ट होत आहेत. सैनिकांचे खच्चीकरण केले जात आहे. उमर खालीद, जिग्नेश मेवाणी यांना महाराष्ट्रात बोलावून दलितांना भडकवले जात आहे. कोरेगाव-भीमा येथील हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना शिक्षा व्हायला हवी, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. येथे १ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सभेचा हेतू सांगितला, तर श्री. उदय बडगुजर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. डॉ. विनायक चिरडे यांनी आभार मानले. ५ सहस्र धर्माभिमान्यांनी सभेचा लाभ घेतला.

शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांनी सभेचा आरंभ झाला. या सभेला स्थानिक ह.भ.प. साहेबराव भोयर महाराज, ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के, ह.भ.प. योगानंद महाराज, ह.भ.प. दिनकर गुरु महाराज, ह.भ.प. घोगरे महाराज आणि सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.