पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला निषेध – जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात निवेदन

0
687
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     भाजपा सरकारने केंद्राचे अर्थसंकल्प मांडले मात्र सर्वसामान्य माणसाला दिलासा यात मिळाला नाही उलट पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने या दर वाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला असून ही दर वाढ तत्काळ मागे घेण्यात यावी यासाठी ५ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
      गेल्या तीन वर्षांपासून भाजपा सरकार सत्तेवर आले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून सर्व सामान्य नागरिकांना आश्वासन दिले. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव यावर सरकारने नियंत्रण ठेवले नाही. यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढले आहे. याचा सर्व सामान्य माणसाला त्रास होतो आहे. ही दर वाढ तत्काळ मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी, पिकविम्याचे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्यास विमा कंपनीला आदेश द्यावेत, दुरदर्शन केंद्र बंद करू नये आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
      यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, अॅड. मेहेरे, अॅड. मनोहर देशमुख, अल्पसंख्यांक सेल शहर अध्यक्ष समीर जानवानी, स्वाती गावंडे, रामदास गवई, विजय डोंगरे, परशराम आगाशे, मो. साबीर, गजानन शिंगनजुडे, गजानन भोयर, सचिन रॉय, लक्ष्मण दर्येकर, मो. जुबेर यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.