फोक डान्ससाठी श्रावनी वानखडे ची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड – राष्ट्रीय पातळीवर पटविला व्दितीय क्रमांक

0
1212
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
   चांदुर रेल्वे शहरातील राहिवासी समीपराव वानखडे यांची मुलगी श्रावनी वानखडे हीची आंतरराष्ट्रीय पातळीवर फोक डान्ससाठी निवड करण्यात आली आहे.
     श्रावनी वानखडे अकोला येथील स्कुल ऑफ स्कॉलरमध्ये नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. गोव्यातील वास्को दी गामा येथे नॅशनल स्पोर्टस् डान्स फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत श्रावणी वानखडे हीने फोक डान्समध्ये व्दितीय क्रमांक पटकाविले व तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडसुध्दा झाली आहे. चांदुर रेल्वे शहराचे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नावलौकीक केल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.