सावळा शिवारात शेतातील विहिरीमध्ये बिबट्या, वनविभागाची रेस्क्यू टीम ने बिबट्याला बाहेर काढण्यास यश

0
677
Google search engine
Google search engine

 

– दयालसिंग चव्हाण,

संग्रामपुर :- तालुक्यातील सावळा शिवारात माधव सपकाळ यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबटया पडल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

 

सावळा परिसरातील विहिरीत बिबटया पडल्याचे दि 8 फेब्रुवारी रोजी सकाळी च्या दरम्यान स्थानिकांना आढळले. त्यानंतर पोलिस, ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून रात्री 7 वाजताच्या सुमारास बिबटय़ाला रेस्क्यू टीम ने काढण्यास यश प्राप्त आले. तालुक्यातील निवाणा पासून 10 किमी अंतरावर सावळा गावबाहेरील शेतामध्ये विहीरीते बिबट्या आढळून आले आहे. या विहिरीत बिबटया पडल्याचे येथील एका ग्रामस्थाला आढळल्यानंतर त्यांनी अन्य ग्रामस्थांना व वनविभागाला माहिती दिली. वनविभागाची रेस्क्यू टीमने बिबटयाला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. विहिरीत पिंजरा सोडल्यावर बांबूचा वापर करून बिबटयाला पिंज-यात हुसकावून लावण्यात आले. त्यानंतर बिबटयाला बाहेर काढण्यात यश आले आहे.