*परळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा मनमानी कारभार*

0
945
Google search engine
Google search engine

 

परळी वैजनाथ
तालुका प्रतिनिधी : *दिपक गित्ते*

सविस्तर वृत्त असे की, परळी वैजनाथ(बीड जिल्हा) शहरातील नामांकित शासकीय उपजिल्हा रुग्णालयात खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते , त्यात आपले अधिकारी खूपच चांगल्या प्रकारे वेळेचे पालन करून रुग्णांची सेवा खूप चांगल्या प्रकारे करताना दिसत आहेत, करण आज एक रुग्ण रुग्णालयात आला होता ज्याला कुत्र्याने चावा घेतला होता तर त्याला तपासणीसाठी एकही अधिकारी हजार नव्हता.

 

उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना आपल्या कार्यालयात हजर राहण्याची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार सकाळी- 8:30 ते 12 आणि दुपारी 4:00ते 5:00 तर आज वार शुक्रवार सकाळी 10:30 झाले तरी अधिकारी आपल्या कबिन मध्ये आढळून आले नाहीत जवळ जवळ 2 तास उशीर झाला तरी अधिकारी गायब ? तर असा प्रश्न निर्माण होतो की जर एखादा आपत्कालीन रुग्ण जर आला तर त्यांना तपासनी साठी एक तरी अधिकारी हजार असायला हवांना?
तर डॉक्टरांच्या कबिन बहिरील कंपौंडर ला विचारणा केली असता त्याकडून सांगण्यात आले की साहेब सही करायला गेले आहेत , परत तासाभराने दुसरा एक रुग्ण आला ज्याचे वय साधारण 5 वर्ष असेल त्याचे डोके फुटले होते व त्याच्या वडलांनी विचारणा केली त्यांना ही कंपौंडर चे परत तेच उत्तर की साहेब सही करायला गेलेत जर सही करायला यांना 1-2 तास लागत असेल तर रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोईस कोण जबाबदार राहणार ?
याकडे जर वैद्यकीय विभागाने लक्ष देण्याची गरज आहे कारण डॉक्टर्स हे रुग्णाच्या सेवेसाठी असून ना की टाईमपास करण्यासाठी आहेत .
वैद्यकीय विभागाने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे जेणे करून परळी किंवा बाहेर गावातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही .