हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने अमरावती शहरातून भव्य वाहन फेरी !

0
934
Google search engine
Google search engine

 

हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन

अमरावती – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती येथे ११ फेब्रुवारी २०१८ यादिवशी संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर सायंकाळी ६.०० वाजता विशाल हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. होर्डिंग, भित्तीपत्रके, हस्तपत्रके, विविध धर्माभिमान्यांच्या बैठका, उद्घोषणा, पथनाट्य,सोशल मिडिया या माध्यमातून केल्या जाणार्‍या प्रसारामुळे धर्मजागृती सभेच्या पूर्वतयारीस वेग आला आहे. सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रसाराचा एक भाग म्हणून समितीच्या वतीने गुरूवार दिनांक ८ फेब्रुवारी यादिवशी सायंकाळी ४ वाजता वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

 

वाहनफेरीचा प्रारंभ संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावरून होऊन शहराच्या मुख्य भागांतून ही फेरी नेण्यात आली.वाहनफेरीची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून करण्यात आले. या वेळी सनातनचे संत आणि विदर्भ प्रसारसेवक पू.अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. फेरीच्या मार्गात काही ठिकाणी थांबून धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले आणि राजकमल चौक येथे पुष्पवृष्टीही करण्यात आली आणि युवा नगरसेवक प्रणीत सोनी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले विलासनगर नारायणनगर अश्या विविध ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले

शहर आणि ग्रामीण भागातील युवकांचा या वाहनफेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.फेरीची सांगता मान्यवरांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. यामध्ये हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

 

सर्व वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. फेरीतील सर्वांनी भगव्या टोप्या आणि फेटे घातले होते. या वेळी ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा धर्माभिमान्यांनी देऊन सर्व परिसर दणाणून सोडला. 

धर्मध्वजाचे पूजन:-  नगरसेवक श्री चंद्रकांत बोमरे, विशव हिंदु परिषदचे डॉक्टर श्री सुरेश चिकटे सनातनचे संत पू. श्री अशोक पात्रीकर आ.श्री ज्ञानेश्वर धाने पाटील, हिंदू जनजागृती समितिकरिता श्री श्रीकांत पिसोळकर व श्री निलेश टवलारे

वेशभूषा जिजाऊमाता सौ.कांचन ताई ठाकूर,
शिवाजी महाराज : तेजस ठाकूर,
झाशीची राणी : शबरी देशमुख.

उपस्थित मान्यवर...

अमोल जगदाळे, रोषण सोलाव पवन किर्क्त्ते अमोल हंबर्डे, तपेश हंबर्डे, सुमंगल खत्री, प्रमोद शर्मा अमित गायकवाड स्वराज शर्मा मनोज विषवकर्मा, तुषार तिडके, संकेत टवलारे, जय देशमुख,अरुण वरुडकर, पवन शेंद्रे, श्रीकांत मुन्डेकर, समिधा वरुडकर, विभा चौधरी, उशा कांबळे, नलिनी ठाकरे, दुर्गा कडूकर, छाया टवलारे, स्मिता ठाकरे असे २५० हून अधिक धर्मभिमानी उपस्थीत होते