*तात्या टोपेचें वंशज ,स्वातंञ सेनानी स्वामी सांख्यायनजींची अकोटला भेट*

0
619
Google search engine
Google search engine

 

आकोटः (संतोष विणके )  :-

 

सन १८५७ च्या ऐतीहासिक उठावातील योद्धे तात्या टोपे यांचे वंशज स्वामी सांख्यायनजी सरस्वती (दिल्ली)यांनी आज (दि१०)आकोटला भेट दिली.शहरातील महर्षी दयानंद सरस्वती मार्गाच्या लोकार्पण व नामकरण कार्यक्रमासाठी ते आकोटला आले होते. ते म्हणाले महापुरुषांच्या विचारांची उपेक्षा हा राष्ट्रद्रोह आहे.या देशाला स्वातंञ मिळवुन देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलीदान केले.स्वातंत्र्यासाठी त्यावेळच्या युवा पिढीमध्ये एक जज्बा होता.संघर्ष होता.त्या संघर्षातही एक शिष्टाचार होता.आज माञ तसे वातावरण दिसत नाही.भ्रष्टाचार ,बेरोजगारी यामुळं आजचा युवा दृष्टीहीन होत आहे.त्यामुळं दृष्टीचं नसेल तर दिशा कशी मिळेल.असे विचार व्यक्त करत त्यांनी काळजी व्यक्त केली.ईतिहास संशोधन,अध्यात्म ,आयुर्वेद,वेदअभ्यास यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या स्वामी सांख्यायनजी सरस्वती यांची विविध विषयावर ७० पेक्षा जास्त पुस्तंक प्रकाशीत आहेत असे त्यांनी सांगीतले.