शासनाने नुसत्या घोषना न करता शेतकऱ्यांना  तात्काळ मदत करावी-अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन

0
531
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी : जावेद शाह /  अंजनगाव सुर्जी-

११ तारखेला अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली.त्यात मोठ्या प्रमाणात गारपीठीचा तड़ाखा शेतकर्याच्या शेतातील उभ्या पिकांस बसला

अंजनगाव सुर्जी तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व वादळी वा-यासह गारपिट झाली. त्यात शेतक-यांच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहु, भाजीपाला तसेच केळी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. ते पूर्ण करून आपदग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन अंजनगाव सुर्जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने
अमरावती जिल्हा वक्ता प्रदीप येवले यांच्या नेतृत्वाखलील राजेंद्र बारब्दे, अफसर बेग,सागर हुरबडे, नईम जमीनदार, विजु काळे, एजाज अली, श्रीकांत भुयार, नगर सेवक रहीम भाई, तसेच अनेक शेतकरी शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.