जगदंब पब्लिक स्कुल मध्ये ३ दिवसीय स्नेहसंमेलन थाटात पार

0
1388
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:-शशिकांत निचत

 

स्थानिक बेलोरा रोडवरील जगदंब पब्लिक स्कुल मधील स्नेहसंमेलन 2018 चा कार्यक्रम नुकताच पार पडला असून यांच्या अध्यक्ष स्थानी अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू तर उदघाटक म्हणून आपल्या आवाजाच्या वेगवेळ्या दबीग करणारे आणि लहान मुलांचे मनोरंजन करणारे मेघना एरंडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नुकत्याच झालेल्या सारेगमप मधील महाविजेता महागायिका अंजली गायकवाड उपस्थिती होते.

दिनांक 11 फ्रेब्रुवारी ला जगदंब पब्लिक स्कुल च्या प्रगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पावसाचे वातावरण असल्याने सुरुवातीला कार्यक्रमाला प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती.मात्र अंजली गायकवाड आणि मेघना एरंडे यांच्या मनोरंजन आणि सुरेल अश्या आवाजामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्नेहसंमेलन ला मिडाळा.पंचक्रोशीतील अनेक मान्यवर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होते.दुसऱ्या दिवशी लहान मुलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले होते.यावेळी जगदंब पब्लिक स्कुल चे संस्थापक,आणि कार्यक्रमाचे आयोजन करणारे विनोद कोरडे,नगरसेवक नितीन कोरडे नगर परिषद चांदुर बाजार,सामाजिक कार्यकर्ते मनोजदादा कटारिया,उदय देशमुख, हे उपस्थित होते.