शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार – माणुसकी बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

0
830
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .) 
स्थानिक माणुसकी बहुद्देशीय संस्थाव्दारे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून अपंग मुकबधिर सेवा संस्थान सोनगाव व चांदुर रेल्वे येथील बालगोपालांसोबत अल्पोपहाराचा आनंद घेण्यात आला.
         यावेळी नगरसेवक वैभव गायकवाड, नितीन इमले, दीपीका आयटे, प्राविण्य देशमुख, सारंग देशमुख, अक्षय ठोंबरे, रोशन अंबुलकर, अंकित देशमुख, प्रतिक राय, दिनेश वाघाडे, राहुल जगताप, अमर घटारे, भूषण सरदार व अपंग मुकबधिर सेवा संस्थान सोनगावच्या सोनाली भोयर, संदीप लांजेवार आदी कर्मचारी उपस्थित होते…