धानोरा येथे खासदार रामदासजी तडस यांचा सत्कार-मोर्शी तालुक्यातील धानोरा एक आदर्श गाव – खा. रामदासजी तडस यांचे प्रतिपादन.

0
637
Google search engine
Google search engine

 

रुपेश वाळके / मोर्शी- 

धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानानिमित्य प.पु.श्री.श्री. रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमामध्ये खासदार रामदासजी तडस यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वर्धा लोकसभेचे खासदार रामदासजी तडस हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टेट काँसील (YLTP)कर्मयोग अरुनजी बोबडे,जिल्हा काँसिल (YLTP) कर्मयोग अशोकजी नानोटकर , उपविभागीय अधिकारी मनोहरजी कडू , सरपंच दिनेशजी जवंजाळ , युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशजी अग्रवाल , तालुका अध्यक्ष अजयजी आगरकर , शहर अध्यक्ष दिपकजी नेवारे , उत्तमराव शेरेकर , धिरजजी गुल्हानेे , मिनारपंत देशमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना खासदार रामदासजी तडस म्हणाले की , गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी पार पाडावी आणि गावाच्या विकासाला हातभार लावून एक आदर्श गाव तयार करावे व नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेला साथ देऊन प्रत्येक गाव हे स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन आपलं गाव स्वच्छ करून एक आदर्श गाव निर्माण करावं व गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा असे ते या प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले की , धानोरा गावाच्या विकासाकरिता मी नेहमी प्रयत्न करीत राहील व गावाच्या विकासाकरिता जो काही निधी लागेल तो निधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मी करणार व ग्रामीण भागातील महिलांना रोजगार प्राप्त व्हावा या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धानोरा येथिल गोकुल आहाके , आनंद शर्मा , पंकज कोरे , पवन शर्मा , विवेक देशमुख , उमेश वाढीवे , ईश्वर धुर्वे , प्रदीप आहाके , प्रियांका उंबरझरे , कल्पना कुंभरे , बबिता कुंभरे , मनीषा उईके , आनंद पांडे , आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालन यशवंत सलामे यांनी केले तर आभार पवन शर्मा यांनी मानले.