*संत तुकाराम बीजेच्या पूर्वसंध्येला भक्तीरंगाची उधळण*

0
675
Google search engine
Google search engine

संतोष विनके/-

श्रीक्षेत्र कालवाडी दिपोत्सवाने उजळले

व-हाडचे देहू म्हणून प्रख्यात श्रीक्षेत्र कालवाडी येथे जगद्गुरु संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज बीज सोहळा
संपन्न होत असून आज बीजेच्या पूर्वसंध्येला तुकोबा या पुण्यभूमीत साक्षात अवतरतात या भावनेने कालवाडी ग्राम भक्तीरंगात न्हाऊन निघाले

भाविकांनी भक्तीरंगाची उधळण करीत दिपोत्सव साजरा केला.
घरोघरी सडासारवण ,रांगोळी व पताकांनी ही संतवाडी फुलून गेली होती. *”साधूसंत येती घरा तोचि सण दिवाळी दसरा”* याचा अनुभव आला. टाळ,मृदंगाच्या स्वरात ज्ञानोबा -तुकारामाच्या गजराने ही भूमी दुमदुमून गेली होती.घरोघरी तोरणे दिवे लावत दिपोत्सवात हे ग्राम उजळून गेले होते.
दरम्यान ह.भ.प.श्री देविदास महाराज (चोखोबांचे ) भक्तीभावपूर्ण स्वागत सोहळा पार पडले.
त्यांचे हरिकिर्तन पार पडले.

*आज दि.३ मार्चला बीजोत्सव*

या संतवाडीतील संत तुकाराम महाराज मंदिरात संत तुकाराम बीज सोहळा संपन्न होत आहे.

———— *कार्यक्रम* —————-

पहाटे-६वा -संताभिषेक महापुजा
७ते१०- पालखी सोहळा व गाथा दिंडी
१०ते१३- ह.भ.प.श्री ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे काल्याचे किर्तन
-दु.१२ते२ महाप्रसाद

या भक्ती सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा कालवाडी ग्रामस्थानी केले आहे