भाजपाच्या शहरध्यक्षपदी प्रसन्ना पाटील यांची निवड – जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी केली घोषणा

0
755
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –
     भाजपाच्या चांदूर रेल्वे शहराच्या अध्यक्षपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदाची माळ प्रसन्ना पाटील (चौधरी) यांच्या गळ्यात पडली आहे.
     भारतीय जनता पक्षाची बैठक नुकतीच स्थानिक विश्रामगृहात पार पडली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांनी माजी आमदार अरूण अडसड यांच्या उपस्थितीत चांदूर रेल्वे शहरध्यक्षपदी प्रसन्ना साहेबराव पाटील (चौधरी) यांच्या निवडीची घोषणा केली. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांत एक नवा उत्साह संचारला आहे.
      प्रसन्ना पाटील यांच्या निवडीबद्दल तालुका अध्यक्ष आशुतोष गुल्हाने, बबनराव गावंडे, धीरेंद्र खेरडे, डॉ. सुषमा खंडार, अॅड. राजीव अंबापुरे, गुड्डु बजाज, उत्तमराव ठाकरे, लाला पनपालीया, संदिप सोळंके, प्रमोद नागमोते, लताताई बागडे, विलास तांडेकर, संजय मोटवानी यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.