आरोग्य सभापतीमुळेच मिळेल ‘अ’ स्वच्छतेचा पुरस्कार..!

0
732
Google search engine
Google search engine

शेगांव:- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मागील०४ वर्षा पासून संपूर्ण भारत भर स्वच्छता अभियान सुरू आहे यात विदर्भ पांढरी म्हणून ओळखल्या जाणारी नगरी म्हणजेच शेगावची संतनागरी आहे. इथली स्वच्छता पाहता आपल्या गावात सुद्धा स्वच्छता राहावी व शेगांवला स्वच्छतेचा पुरस्कार मिळावा याकरिता आमदार,खासदार,अधिकारी,गावकरी यांनी अतोनात परिश्रम घेतले पण आता शेगांव नगर परिषद मध्ये नव्याने आरोग्य सभापती म्हणून सौ. ज्योतिताई चांडक यांची नियुक्ती झाली आणि गावातील स्वच्छता पहा कशी अस्वच्छ झाली आहे असे वाटते की यांना आरोग्य सभापती नाही तर जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे “आरोग्य धोका सभापती” हे नविन पद द्यावे. मागील काही दिवसा पासून घाण कचरा गाडी खराब पडलेली आहे.नगर परिषद मध्ये मागील ०५महिन्या पासून बीएसी पावडर नाही प्रभागमध्ये फ़ॉगिंग मशीन येत नाही.
आताचे वातावरण पाहता अवकाळी पाणी सुरू आहे त्यामुळे वायरल इन्फेक्शन सुरू आहे लोक आजारी आहे परुंतु इथल्या सभापतीला त्याच्याशी काही घेणे-देने नाही.आपण माहिती,निवेदन किंवा तक्रार घेऊन गेले तर नगर परिषदच्या आरोग्य सभापती ऑफिसला कधीच हजर नसतात मग निर्माण झालेल्या समस्या माडांच्या कुणाकडे ? आम्ही जेव्हा शहरात विचारले की आपण सभापतीला काही सांगत नाही का तर म्हणले की आम्हणाला माहिती नाही की सभापती कोण आहेत शहर तर दूरच त्याच्या स्वतःच्या प्रभाग नाही तर त्यांना त्यांच्या वार्डात आपल्या लोकप्रतिनिधीला कोणते पद आहे हे सुध्दा माहिती नाही आता तर असे म्हणावे लागेल की “आपण यांना पाहिलत का” हा प्रश्न निर्माण होतो.
वरील फोटो त्याच्याच वार्डातील आहे किती घाण आहे आपण पाहू शकता जे सभापती आपल्याच वार्डातील स्वच्छता करू शकत नाही तसेच भैरव चौक ते शिवनेरी चौक हा रहदारीचा मार्ग आहे या रस्त्यावरून शाळकरी विदयार्थी ये-जा करतात हा रस्ता खूप संकुचित आहे आजू बाजूला मोठ्या नाल्या आहे दुर्घटना टाळता येत नाही. या रस्त्यावर वाहन चालवने कठीन झाले कारण चेंबरचे काम झाले आजुबाजुचे खड्डे तसेच अस वाटते कि ठेकेदाराशी आरोग्य सभापतींनी हात मिळवनी तर नाही ना केली अश्या दुर्लक्षामुळे जर काही बरे वाईट घडले तर काय आरोग्य सभापती याची जबाबदारी घेतील आता तुम्हीच ठरवा आशा सभापतील या पदावर राहण्याचा अधिकार असावा का असा जनतेतुन सूर येत आहे.असे सुरू राहले तर शेगांवला स्वच्छतेचा तर नाही पण ‘अस्वच्छता’ पुरस्कार नक्की मिळेल.

त्यात आता तर नगर परीषदेचे सभापती म्हणे
जनतेच्या पैशाने सिमला टुरला जात आहे किती दुर्भाग्य शेगाव च्या जनतेच