महिला दिनानिमित्त अंगणवाडीत स्नेहसंमेलन – पुरक पोषण आहार प्रदर्शन

0
1017
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 
शहरातील एकात्मीक बाल विकास नविन शहरी प्रकल्पातील अंगणवाडी मध्ये जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी मधी लहान बालकांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन व पुरक पोषण आहारामधून नवनविन पदार्थांच्या मेजवानीचे प्रदर्शन सुद्धा अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी लावले होते. तसेच लहान बालकांनी उत्कृष्ठ नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिकली. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे तर प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम सभापती सौ. कल्पना लांजेवार, नगरसेविका शबाना हमीद कुरैशी, नगरसेवक वैभव गायकवाड, पत्रकार बंडू आठवले, संजय शिंदे, श्रीकृष्ण भोयर उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहूण्यांनी विचार पिठावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी मधील मिळणारा पोषण आहार तसेच विविध सुविधांची माहिती जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहचविता यईल तसेच मिळणार्‍या सोई सुविध विषयी माहीती प्रास्ताविकेतून अंगणवाडी सेविका सिमा बोडखे यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र क्रमांक १३१,१३२, १३३, १३४, १३५, १३६ या अंगणवाडी तर्फे स्नेहमिलन कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्तम पद्घतीने खेळीमेळीच्या वातावरणात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पुरक पोषण आहाराचे प्रदर्शनातील विविध चविष्ठ पदार्थांचा प्रमुख मान्यवरांनी आस्वाद घेतला. यावेळी अंगणवाडी सेविका अरुणा आठवले, सिमा बाडखे, शारदा राऊत, शारदा तायडे, गुलशन कुरैशी, सुनंदा कांडलकर, धनश्री श्रीराव, शिला नागणे, मतसनिस सुनंदा नेवारे, अनुसया नेवारे, वनिता चामलाटे, रजनी शेंद्रे, शारदा वानखडे, नंदा घाटोळे आदी उपस्थित होते. तसेच सहाही अंगणवाडी केंद्रातील सर्व बालके, महीला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहिनी सहारे तर उपस्थितांचे आभार अरुणा आठवले यांनी मानले.