एमएससीआयटी कोर्सला पुरक ठरणारा आहे सि. सि. सि. कोर्स – श्री आशिष जोशी यांची प्रतिपादन 

0
818
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
एमएससीआयटी कोर्सला पुरक ठरणारा सि. सि. सि. कोर्स करण्याची सर्वांना परवानगी असुन भारतामध्ये शासकीय नोकरीसाठी केंद्र शासन मान्यता प्राप्त एक महत्वपुर्ण कोर्स असल्याचे प्रतिपादन आशिष जोशी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय क्र.मातंस / नस्ती ०७/ पक्र ७१/३९ दि. ४ फेब्रुवारी २०१३ च्यानुसार केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापीत स्वायत्त संस्थाव्दारे अधिकृत सि.सि.सि. कोर्स संपूर्ण देशात शासकीय सेवेसाठी संगणक आर्हता परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. एनआयईएलआयटी सोसायटीचा अधिकृत सि.सि.सि. कोर्स हा महाराष्ट्र राज्याबरोबर इतर राज्य व केंद्र शासनाच्या नोकऱ्यांकरिताही उपयुक्त असा संगणक कोर्स आहे. संगणक ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाच्या गट अ, ब, आणि क मधील कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी या संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य होते. मात्र यानंतर एमएससीआयटी कोर्सला पुरक ठरणारा सि. सि. सि. कोर्सला सुध्दा या सर्व कर्मचाऱ्यांना करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत कर्मचारी सुध्दा एमएससीआयटी किंवा सि. सि. सि. कोर्स या पैकी कोणताही करू शकतात. परंतु सि. सि. सि. कोर्सची फी एमएससीआयटी कोर्सच्या तुलनेत अतिशय कमी असुन यामध्ये विद्यार्थ्याला संगणकाचा परिणामकारक रित्या वापर होण्यासाठी उच्च प्रतिचे प्रशिक्षण दिले जाते व यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरीक्त आर्थिक भुर्दंड बसत नाही असे आशिष जोशी यांनी म्हटले. सि. सि. सि. हा कोर्स एनएसक्युएफ अलाईन असुन संपुर्ण भारतात महाराष्ट्रासमवेत १३ राज्यांमध्ये शासकीय नोकऱ्यांसाठी मान्यताप्राप्त आहे.