श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात 25 मार्चला श्रीराम जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन

0
1141
Google search engine
Google search engine

श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात 25 मार्चला श्रीराम जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन

भाविक भक्तांनी उपस्थित रहावे-वैद्य रामदासबुवा रामदासी

परळी/प्रतिनिधी
नितीन ढाकणे

श्रीराम नवमी निमित्त परळी वैजनाथ, गणेशपार भागातील श्री गोराराम मंदिर येथे दि.25 मार्च रोजी दुपारी 12 वा. श्रीराम जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या जन्मोत्सव सोहळयास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यराज रामदासबुवा (दादा) रामदासी व व नंदकुमारबुवा रामदासी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पुरातन अशा जाज्वल्य देवस्थान संस्थान श्री गोराराम मंदिर, गणेशपार येथे श्रीराम नवमी निमित्त जन्मोत्सव सोहळयास गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला आहे. समर्थ रामदास स्वामी सज्जनगड यांचे हस्ते स्थापित हनुमान व पट्टयशिष्य कल्याण स्वामी यांच्या हस्ते अयोध्या येथून आलेल्या श्रीराममुर्तीची येथे स्थापना झालेली आहे असा ज्याचा मोठा इतिहास आहे. अशा गोराराम मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये पाडव्यापासून रामनवमी उत्सवास सुरूवात झाली असून शेकडो वर्षांची परंपरेनुसार याहीवर्षी हा उत्सव साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे भावार्थ रामायणाचे दत्तगुरू प्रसन्न असलेले मांडवेकर महाराज हे पारायण वाचन करीत आहेत. भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यराज रामदासबुवा (दादा) रामदासी व नंदकुमारबुवा रामदासी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.