उद्या चांदूर रेल्वे येथे सुशिक्षित बेरोजगार परीषद – सुभाष वारे करणार मार्गदर्शन ><युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

0
740
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.)-

सगळीकडे कामगार, शेतकरी, शेतमजुर तसेच इतरांच्या अनेक हक्क परिषद होत असतात. परंतु बेरोजगारांची परिषद राज्यात क्वचितच पहावयास मिळते. बेरोजगार युवकांचे प्रश्न खुप कमी लोक आहे तेच हाताळतात. अशातच राज्यातील पाचवी अमरावती जिल्ह्याची सुशिक्षीत बेरोजगार परिषद आज मंगळवारी चांदूर रेल्वे शहरातील सिनेमा चौकातील अशोक टॉकीजमध्ये उद्या सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यासाठी अनेक मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. सुराज्य सेना, माणूसकी बहुउद्देशीय संस्था, साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्था, प्रहार विद्यार्थी संघटना, ए.आय.एस.एफ., आझाद हिंद क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नवीन नोकर्‍यांच्या संधी न मिळाल्याने अनेक युवक बेरोजगार पडून आहेत. यामुळे अनेक अडचणींना युवक सामोरे जात असून प्रशासनाने याची दखल घ्यावी असा सुर युवकातून निघत असतांना बेरोजगारांच्या प्रश्‍नाला वाचा फोडणारी महाराष्ट्रातील पाचवी सुशिक्षीत बेरोजगार परिषद आज (ता. २७) ला चांदूर रेल्वे शहरात होणार आहे. यापुर्वी सदर परीषद पुणे, बीड, लातुर, नांदेड या शहरात झाली असुन यानंतर चांदूर रेल्वेत होत आहे. या परिषदमध्ये बेरोजगारांना नोकऱ्या द्या किंवा बेरोजगारी भत्ता द्या, अंशकालीन, होमगार्ड व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमीत करून सर्व रिक्त जागा तातडीने भरा, अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी पुत्रांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र असलेल्या युवकांना नोकर्‍या द्या, स्पोर्ट कोट्यातील नोकरीच्यावेळी खेळाडूंची चाचणी मंडळाकडून न घेता शासकीय प्रशासनाकडून घ्यावी यांसह विविध मागण्यांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. तसेच या कार्यक्रमात युवकांचे मत ऐकुन घेणार असुन यावर चर्चा सुध्दा करण्यात येणार आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील संविधान अभ्यासक तथा सुराज्य सेनेचे संस्थापक सुभाष वारे, मुंबई येथील सुराज्य सेनेचे संस्थापक सदस्य राजेंद्र भिसे, नांदेड येथील सुराज्य सेनेचे सदस्य फारूख अहेमद उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे, प्रा. डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. डॉ. एस. एस. ठाकरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नितीन गवळी व गौरव सव्वालाखे आहे.
तरी या परिषदेला जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होवुन आपले मत उपस्थित मान्यवरांसोबत मांडावे असे आवाहन शहेजाद खान, प्राविण्य देशमुख, चेतन भोले, सौरभ इंगळे, संदिप शेंडे, पिंटु हुसैन, सागर दुर्योधन, निलीमा जवंजाळ, मयुरी चौधरी, मनिष खुने आदींनी केले आहे.