पळसखेड गावात लागली आग – सुदैवाने जीवीतहाणी नाही

0
1346
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 चांदूर रेल्वे वरून ८ कि. मी. अंतरावर असलेल्या ग्राम पळसखेड या गावात सोमवारी दुपारी १.३० वाजता आग लागली असुन सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहाणी झालेली नाही.
    तालुक्यातील पळसखेड येथील गावालगतच असलेल्या गावठाणमध्ये लोकांनी आपापले लाकडे, कुटार मोठ्या प्रमाणात ठेवले होते. तसेच अनेकांनी कोठे बांधुन गुरे-ढोरे, बकऱ्या ठेवल्या होत्या. या गावठाणमध्ये सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे अंदाजे १५ क्विंटल लाकुड, कुटार, कोठे जळुन खाक झाले. सुदैवाने गुरे-ढोरे बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले तसेच इतर जीवीतहाणी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम चांदूर रेल्वे नगर परीषदेचे अग्णीशमन दल घटनास्थळी पोहचुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर थोड्याच वेळात धामणगाव रेल्वे येथील सुध्दा अग्णीशमन दल घटनास्थळी पोहचले होते. दोन्ही दलांनी लवकरच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये अंदाजे एकुण ७०-८० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
      घटनास्थळी नायब तहसिलदार राठोड, तलाठी वानकर, पठान, ग्रामविकास अधिकारी निलेश वाघ, सरपंच रवि देशमुख, माजी सरपंच संजय पुनसे, नगरसेवक संजय मोटवानी यांनी भेट दिली. यानंतर तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. सदर आग शॉर्टसर्किटने लागली की कोणी लावली? याबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली नाही.