पॅनकार्डला ‘आधार’देण्यास मुदतवाढ

0
545
Google search engine
Google search engine

पॅनकार्डला ‘आधार’देण्यास मुदतवाढ

बीड: नितीन ढाकणे

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) पॅनकार्ड व आधार कार्ड क्रमांक लिंक करण्याच्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आधार जोडणी संदर्भात विविध सेवादात्यांना अंतिम मुदतीत वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. सरकारतर्फे पॅन क्रमांक आधारशी जोडण्यासाठी देण्यात आलेली ही चौथी मुदतवाढ आहे.