*आकोटातील गजबजलेल्या यात्रा चौकाची गर्दी गैरव्यवस्थेतुन सुटका*

0
1130
Google search engine
Google search engine

आकोट / प्रतीनीधी –

अकोट शहरातील याञा चौक हा मध्यवर्ती भाग आहे.संध्याकाळी भाजी खरेदीदारांची मोठीच गर्दी या भागात असते.भाजी विक्री साठी विक्रेते हे सडके वरतीच बसत असल्याने मार्गावर कायम गर्दी वा गैरव्यवस्थेची परीस्थीती असते. माञ अकोट शहर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व नगर परिषद मुख्याधिकारी गीता ठाकरे ह्यांनी यात्रा चौकातील रस्त्यावर भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले ह्यांना पर्यायी जागा देऊन यात्रा चौक ते कालंका चौक दरम्यान चा रस्ता रहदारीस मोकळा केला. गेल्या अनेक वर्षा पासून भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले यात्रा चौक ते कलंका चौक दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूला बसून भाजीपाला विक्री करीत होते,त्यामुळं येथे संध्याकाळी पायदळ चालणे देखील कठीण होते. ताजी भाजी मिळत असल्याने सर्व अकोट वासी भाजी खरेदी करण्या साठी येथे गर्दी करीत असल्याने, संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत ह्या रस्त्या वरून सामान्य नागरिकांना जाणे येणे करणे अत्यंत जिकरीचे होत होते, नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन नगर पालिका मुख्याधिकारी गीता ठाकरे व अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पुढाकार घेऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना बाजुलाच पर्यायी जागा देऊन रस्ता मोकळा करून घेतला त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी झाल्याने नागरिकांनी या पुढाकाराचे स्वागत केले. महत्वाचे म्हणजे शिवाजी चौक व सोनु चौक मोकळा केल्यां नंतर याञा चौक देखील मोकळा झाल्याने वाहतुकीची कोंडी सुटली आहे.या मोहीमेसाठी नगर पालिकेचे अभियंता स्नेहल कुमार ,स्वछता निरीक्षक सरफराज ह्यांचे सह पोलीस व पालीका प्रशासनाचे सहकार्य लाभले.