पाक सैन्याच्या विरोधात वृत्त प्रसारित केल्याने प्रसिद्ध ‘जियो न्यूज’ वृत्तवाहिनीवर बंदी

0
850
Google search engine
Google search engine

इस्लामाबाद – पाकमधील प्रमुख वृत्तवाहिनींपैकी एक असलेल्या ‘जियो न्यूज’वर बंदी घालण्यात आली आहे. पाक सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. पाकमधील जवळपास ८० टक्के परिसरात वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आले आहे, अशी माहिती या वाहिनीच्या मुख्य संपादकांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत दिली. पाकच्या सैन्याकडून याविषयी  अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.