अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची बुलडाणा तालुका कार्यकारिणी जाहीर – अध्यक्ष पदी इलियास खान तर सचिव पदी मिर्ज़ा वसीम बेग

0
609
Google search engine
Google search engine

शेख इम्रान / बुलढाणा

विद्यार्थी,शाळा व शिक्षकांच्या समस्या सोडविणे व शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने बुलडाणा तालुक्यात अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या तालुका शाखेची स्थापना करण्यात आली.यासाठी नगर परिषद गुप्ता शाळेत तालुक्यातील उर्दू शिक्षाकांची बैठक ठेवण्यात आली होती ज्यात सर्वसंमती ने तालुका शाखेची रचना करण्यात आली.देऊळघाट जि.प.मुलींची शाळा येथील इलियास खान यांची तालुका अध्यक्ष पदी तर धाड जि.प.शाळेतील मिर्ज़ा वसीम बेग यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली.उमर फ़ारूक़ खान(जि.प.उर्दू शाळा धाड) यांची तालुका कार्याध्यक्ष पदी तर सय्यद खालिद(न.प.उर्दू शाळा बुलडाणा) यांची तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मुहम्मद तौसीफ(चांडोल), अरशद खान(देऊळघाट), चांद खान(धाड), शेख ज़ुबैर(बुलडाणा) ह्यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली. शेख मुखतार(धाड) व अब्दुर्राज़िक़(देऊळघाट)ह्यांची सहसचिव पदी निवड झाली.

मुहम्मद मुशीर(धाड) यांना सल्लागार तर रईस अहमद(बोरखेड) यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली. शेख अहमद(मढ़), ग़ुलाम ज़ाकिर(वरुड), जावेद खान(धाड़), शहादत खान(धाड़), शेख नईम(देऊळघाट) ह्यांची तालुका संघटक पदी निवड झाली. फरज़ाना अफसर अब्दुल क़य्यूम खान(देऊळघाट) व अनीस फ़ातेमा कमरुद्दीन(मढ़) ह्यांची तालुका महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.या कार्यक्रमात राज्य अध्यक्ष मुहम्मद हनीफ, राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा, राज्य संघटक मुहम्मद अशफ़ाक़, अमरावती विभागीय सचिव ऐडोकेट मतीन, जिल्हा अध्यक्ष सय्यद अनीस, जिल्हा सचिव शेख रहीम कुरेशी, जिल्हा कार्याध्यक्ष माजिद अली खान, जिल्हा कोषाध्यक्ष शारिक ज़ुबैर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मंजूर, जिल्हा संघटक शेख अनवर, जिल्हा अध्यक्ष(खाजगी) रईस क़ाज़ी, जिल्हा सचिव(खाजगी) तंज़ीम हुसैन, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष रफ़ीक़ खान, तालुका सचिव शेख अक़ील, तालुका सहसचिव शेख हनीफ, तालुका सल्लागार शेख रब्बानी, शेख जलील, शेख अज़ीम कुरेशी, पत्रकार तौफ़ीक़ साहब सह मोठ्या संख्येत तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमात रज़ाउल्लाह खान यांचा खाजगी जिल्हा शाखेत संघटक म्हणून प्रवेश करण्यात आला. तसेच विदर्भ उपाध्यक्ष यास्मीन हमदानी यांना राज्य महिला प्रतिनिधी व माजी जिल्हा अध्यक्ष अब्दुस्सईद यांना विदर्भ सचिव पदी बढती देण्यात आली.