इस्रोने रचला इतिहास

0
1088
Google search engine
Google search engine

इस्रोने रचला इतिहास

प्रतिनिधी: दिपक गित्ते व नितीन ढाकणे

भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)ने आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून IRNSS-1आय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. विशेष म्हणजे हा उपग्रह स्वदेशी बनावटीचा आहे.

या सॅटेलाइटचे वजन 1425 किलोग्राम आहे. तसेच त्या उपग्रहाची लांबी 1.58 मीटर, उंची 1.5 मीटर आणि रुंदी 1.5 मीटर असून, हा उपग्रह बनवण्यासाठी 1420 कोटी रुपयांइतका खर्च आला आहे. या उपग्रहामुळे देशातील जीपीएस प्रणाली सक्षम होण्यासाठी मदत होणार असून, समुद्रातील दिशा समजण्यासाठीही हा ग्रह फायदेशीर ठरणार आहे. तसेच या सॅटेलाइटचा नौदलाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.