देशी दारू विक्री करणारे 3 आरोपी याना अटक

0
959
Google search engine
Google search engine

देशी दारूची विक्री करणारे गजाआड

आसेगाव पोलिसांची कार्यवाही

चांदुर बाजार:-

तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आज दिनांक 14 एप्रिल ला शांततेच्या दृष्टीने चोख बंदोनस्त लावण्यात आला होता.गुप्त माहिती च्या आधारे आसेगाव चे ठाणेदार अजय आकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेड केली असता त्यांना आरोपी ही देशी दारू ची विक्री करताना मिळून आले.पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली.

प्रमोद अरुण घन वय 30 वर्ष रा.असदपूर यांच्या कडून 11 देशी दारूच्या पावत्या किंमत 660 रुपये,कैलास लहानुजी वामनेकर वय 53 वर्ष रा विरुळ गंगामाई यांच्या कडून 30 नग देशी दारू पावती किंमत अंदाजित 1800 रुपये,मोरेश्वर किसनराव बोरकर वय 47 वर्ष रा.राजनापूर्णा यांच्या 40 नग दारू पावत्या आणि किंमत 2400 रुपये अशा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.

सदर कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनखली सैयद अजमल,नंदकिशोर बाकल,स्वप्नील तवर, भटकर यांनी केली.