आंबेडकर जयंतीदिनी प्रबोधनात्मक पुस्तके व बुंदी वाटप बहुजन समाज विचार मंचचे आयोजन

0
1114
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    बहुजन विचार मंच, चांदूर रेल्वे व्दारा भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य प्रबोधनात्मक पुस्तकांचे व बुंदीचे वाटप शनिवारी स्थानिक जुना मोटार स्टँड येथे करण्यात आले.
    सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन करून हारार्पण करण्यात आले. यानंतर अवधुत घोडेस्वार गुरूजी यांच्यातर्फे सच्ची रामायण, डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी मनुस्मृती का जाळली?,  देवळांचे धर्म आणि धर्माची देवळे, रामदास आणि पेशवाई, मनुस्मृती राष्ट्र गौरव या राष्ट्र कलंक या प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यासोबतच बुंदीचे सुध्दा वाटप केले.
    यावेळी अवधुत घोडेस्वार, नितीन गवळी,  प्रा. प्रसेनजित तेलंग, अॅड. राजीव अंबापुरे, राष्ट्रपाल मेश्राम, स्थुल सर, सुरेश मेश्राम, धर्मराज वरघट यांच्यासह अनेक नागरीक यावेळी उपस्थित होते.