अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची चिखली तालुका कार्यकारिणी जाहीर – मुहम्मद अरशद अध्यक्ष पदी नियुक्त

0
958
Google search engine
Google search engine

चिखली-

विद्यार्थी,शाळा व शिक्षकांच्या समस्या सोडविणे व शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने चिखली तालुक्यात अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या तालुका शाखेची स्थापना करण्यात आली.यासाठी रहीम अली खान नगर परिषद शाळेत तालुक्यातील उर्दू शिक्षाकांची बैठक ठेवण्यात आली होती ज्यात सर्वसंमती ने तालुका शाखेची रचना करण्यात आली.अमडापूर जि.प. उर्दू शाळा येथील मुहम्मद अरशद मुहम्मद अमजद यांची तालुका अध्यक्ष पदी तर शेख आसिफ शेख खलील यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली.नगर परिषद उर्दू शाळेतील सलीम सर यांची तालुका कार्याध्यक्ष पदी तर जि.प.उर्दू शाळा इसरूळ येथील शेख फहीम शेख रहीम यांची तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.फखरुद्दीन अहमद एहतेशामुद्दीन(न.प.चिखली) व मुहम्मद सादिक़ मुहम्मद इनायतुल्लाह(मेरा बु.) ह्यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली. कमरुद्दीन अहमद रफीक अहमद(रोहडा) व आसिफ खान इस्माईल खान(असोला बु.)ह्यांची सहसचिव पदी निवड झाली.

शेख जलील शेख मानिक(मेरा खुर्द) यांना सल्लागार तर मुहम्मद एजाज़ अमीन(डोंगरशेवली) यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली. इब्राहीम सर(अमडापुर), मुहम्मद इकरामुलहक(धोत्रा नाईक), शाह अबरार शाह हसन(उंद्री), शेख शकील सर(न.प.चिखली), मोईन शाह(अमडापूर) व अज़ीम सर(न.प.चिखली) ह्यांची तालुका संघटक पदी निवड झाली. शाहेदा परवीन शेख यासीन (उंद्री), सबाहत साएमा बरकतुल्लाह खान(मोहोदरी) व शाहीन सुलताना(उंद्री) ह्यांची तालुका महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.या कार्यक्रमात राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा, राज्य महिला प्रतिनिधी यास्मीन हमदानी, विदर्भ सचिव अ.सईद, विदर्भ कार्याध्यक्ष नदीम राही, जिल्हा अध्यक्ष सय्यद अनीस, जिल्हा सचिव शेख रहीम कुरेशी, जिल्हा कार्याध्यक्ष माजिद अली खान, जिल्हा कोषाध्यक्ष शारिक ज़ुबैर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मंजूर सर व अकबर खान सर,जिल्हा संघटक युनूस पटेल सर, शेख मुबीन सर,खाजगी चे जिल्हा अध्यक्ष रईस क़ाज़ी, जिल्हा सचिव तंज़ीम हुसैन,सहसचिव मुहम्मद सलाहुद्दीन सर व अब्दुलकरीम सर,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष रफ़ीक़ खान, तालुका सचिव शेख अक़ील, तालुका सहसचिव शेख हनीफ, तालुका सल्लागार शेख रब्बानी, बुलडाणा तालुका अध्यक्ष इलयास खान,देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष सय्यद इरफान,मेहकर तालुका अध्यक्ष मुहम्मद कलीम सर, तालुका सचिव सय्यद अबरार सर, तालुका उपाध्यक्ष शेख इरफान कुरेशी,तालुका संघटक मुहम्मद इमरान,शेख अज़ीम कुरेशी,क़ाज़ी निज़ामुद्दीन, पत्रकार शेख वसीम सह मोठ्या संख्येत तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून न.प. प्रशासन अधिकारी आरीफुल्लाह खान,अज़ीज़ुल्लाह खान सर,अनवर खान साहब,अब्दुस्सालिक सर,बडगे सर,सैफुल्लाह सर,जावेद खान सर,शेख अय्यूब अत्तार सर उपस्थित होते.या कार्यक्रमात नुकतेच सेवानिवृत्त केंद्र प्रमुख अज़ीज़ुल्लाह खान यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख मंज़ूर सर,तंज़ीम सर यांनी परिश्रम घेतले.हमीद भाई यांचे सहकार्य लाभले.