श्री मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन – तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

0
761
Google search engine
Google search engine

कोरेगाव भीमा येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंगळवारी (दि.17) सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (19 एप्रिल) जामीनावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.