जोधपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त कलम १४४ लागू – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील खटल्याचा आज निकाल

0
841
Google search engine
Google search engine

 

 

जोधपूर – अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्काराच्या प्रकरणात गेली ५ वर्षे अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या खटल्यावर उद्या (२५ एप्रिलला) येथील स्थानिक न्यायालय निर्णय देणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय न्यायालयाऐवजी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातच सुनावण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जोधपूरसह देहली येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यापूर्वी रामरहिम यांच्या खटल्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराला पहाता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तसेच जोधपूर येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या प्रकरणात पू. बापूजी यांची सुटका झाली, तरी गुजरातमधील एका प्रकरणामुळे ते कारागृहातून बाहेर येऊ शकणार नाहीत.