मौलवी आणि अन्य दोषी यांच्यावर ‘पॉक्सो ऍक्ट’अंतर्गत कारवाई करावी !

0
663
Google search engine
Google search engine

प्रयाग – देहलीच्या गाझीपूर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर गाझियाबादमधील साहिबाबादच्या मदरशात बलात्कार करण्यात आला होता. या बलात्काराला उत्तरदायी मौलवी आणि अन्य दोषींवर ‘पॉक्सो ऍक्ट’अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे प्रयागचे जिल्हाधिकारी सुहास एल्.वाय. यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी प्रयागचे शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री. विशाल गुप्ता, हिंदु युवा क्रांतिकारी मोर्चाचे श्री. अतुल खन्ना, अधिवक्ता राजन शर्मा, अधिवक्ता अवधेश राय, सर्वश्री अंकुर गुप्ता, शिवार्चन पाण्डेय, संदीप शुक्ला, डॉ. अभिषेक केसरवानी, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

याच मागण्यांचे निवेदन काशी (वाराणसी) येथील अप्पर जिल्हाधिकारी (शहर) वीरेंद्र पाण्डेय यांच्याकडे सादर करण्यात आले. ‘इंडिया विथ विझडम्’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अवनीश राय, सनातन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल सिंह सोनू, सनातन सेनेचे शहराध्यक्ष श्री. संजय उपाध्याय, अधिवक्ता विनोद पटेल, अधिवक्ता विकास तिवारी, अधिवक्ता अरुण मौर्या, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.