पातुर तालुक्यात जलक्रांतीसाठी युवतींचा पुढाकार

0
723
Google search engine
Google search engine

अकोला- प्रतीनीधी :-

धरती मातेची धुप राेखन्याकरीता व मायमाऊल्यांची पाण्याकरीताची वणवण थांबवी म्हणुन जा. माता दिनाचे औचित्य साधुन पातुर तालुक्यामधील आलेगावजवळच्या वनामधे डाेंगर दरीमधे वसलेल्या पाचरन या आदिवासीबहुल गावात अकाेला जिल्हा भाजायुमो सहयुवतीप्रमुख अँड.रुपाली राऊत यांनी युवतींसह पाचरनच्या डाेंगरावर जाऊन श्रमदान केले. पाणी फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरुवात झालेल्या जलक्रांतीच्या चळवळीमधे खारीचा वाटा ऊचलावा जेनेकरुन भविष्यातील पाणीटंचाई दुर हाेऊन ऊद्याच्या महिला पाणी टंचाई निवारणार्थ सक्षम बनतील या द्रुष्टिने अँड.रुपाली राऊत यांनी तालुक्यातील युवतींसाेबत श्रमदान केले.या युवतींनी श्रमदानाकरीता पाचरन येथे जाऊन डाेंगरावरील धरती मातेची धुप थांबवन्याकरीता व डाेंगराचे पाणी जमिनीमधे मुरन्याकरीता दगडी बांध टाकले .या उपक्रमामुळे युवतींनी श्रमप्रतिष्ठेचे महत्व कळले तसेच पाणी अडविन्याकरीता व पाणी टंचाई निवारन्याकरीता काेणती व कशी ऊपाययाेजना करावी ,आदींबाबत प्रत्यक्ष व प्राया्ेेगिक माहीती मिळाली.त्याकरीता त्यांना पाचरन येथील दिनकर डाखाेरे व वनमाला डाखाेरे यांनी मार्गदर्शन केले .आदिवासी बहुल पाचरन या गावामधे चालु असलेले पाणी फाऊंडेशनचे काम वेगवेगळ्या ठिकानी चालु असुन तालुक्यातील प्रत्येक गावामधील युवक व युवतींनी जलक्रांतीच्या या चळवळीमधे सहभाग घ्यावा असे आवाहन अँड.रुपाली राऊत यांनी केले.यावेळी त्यांच्या समवेत अपर्णा भटकर ,श्रद्धा पारस्कर,मिताली पारस्कर ,प्रियंका शेगाेकार ,करुणा शेगाेकार,पायल भनके ,आकांक्षा राऊत,व तालुक्यातील युवतींनी श्रमदान करुन धरती मातेला वंदन केले.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे