प्रेयसीला त्रास दिला म्हणून…खून

0
1451
Google search engine
Google search engine

सिंदखेडराजा:- त्या तरुणाचा खून केल्याचे उघड,

सैनिक अटकेत
अवघ्या पाच दिवासात खूनी देऊळगावराजा पालिसांच्या ताब्यात

खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाटात आढळून आलेल्या त्या अनोळखी मृतक तरुणाची ओळख पटली असून तो पिंपळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रियसीला त्रास देत असल्याच्या कारणांवरुन त्याच्या डोक्यात दगडाची फाडी टाकून सैनिकाने खून केल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी आरोपी सैनिकांला देऊळगावराजा पोलिसांनी दि.९ मे रोजी अटक केली. देऊळगावराजा पोलिसांनी मात्र अवघ्या पाच दिवसात खूनी आरोपीला अटक करून गजाआड केले। आहे.

गेल्या ३ मे रोजी देऊळगावराजा तालुक्यातील आसोला फाटा ते असोला जॉहगीर गावाकडे जाणाºया रस्त्यालगतच्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाटामध्ये अनोळखी तरुणाचा खून करुन त्याचे प्रेत टाकण्यात आले होते. त्यामुळे देऊळगावराजा पोलिसांनी या अनोळखी तरुणाच्या खून प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाच्या दाखल करुन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.पोलीस अधिक्षक शशिकुमार मिणा व अप्पर पोलसि अधिक्षक संगीत डोईफोडे तसेच देऊळगावराजा उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे आणि यांनी पथक नियुक्त करुन तपासाला सुरुवात केली तसेच देऊळगावराजा ठाणेदार सारंग नवलकार यांनी तपास करीत असल्याने देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगाव जळगाव या गावातील मृतक तरुण प्रदिप राजू भालेराव असल्याचे निष्वन्न झाले होते. प्रदिपचा खून सिंधी ता.लोणार येथील गणेश बच्छिरे या सैनिकांने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सैनिक गणेश बच्छिरे वय २३ याचे गावातील एका तरुणी सोबत प्रेम संबध होते. या तरुणीला प्रदिप हा त्रास देत होता.अशी माहिती सदर तरुणी गणेश बच्छिरे हा सैन्यातून युटीवर आल्यानंतर सांगत असे. त्यामुळे प्रदीप विषयी गणेश चिड व्यक्त करीत असे. दि.२ मे रोजी देऊळगावराजा येथे गणेश व प्रदीपने सोबत दारु पिली. त्यावेळी गणेश ने मी ज्या मुलीवर प्रेम करतो तु तिला त्रास का देतो अशी विचारणा केली त्यावेळी गणेश व प्रदीप मध्ये बोलचाल झाली. प्रदीप जास्त पिल्यामुळे तो झिंगत होता व झोप आल्यासारखे करीत होता. ही संधी पाहून गणेशने त्याच्या डोक्यात दगडाची फाडी टाकून त्याला ठार केले. व त्याचे प्रेत उपरोक्त पाटात टाकून दिल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान गणेशला पोलिसांनी सिंधी ता.लोणार येथून ताब्यात घेतले त्यावेळी त्याने खुनाबाबत उपरोक्त माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास देऊळगवराजा पोलिस करीत आहेत. देऊळगावराजा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात खून करुन फरार झालेल्या आरोपीला गाजाआड केले. तालुक्यातील वर्षभरातील दुसऱ्या खुनाचा छडा लावल्याने देऊळगावराजा पोलिसांचे कौतूक होत आहे. या कामगिरीत पोलिस निरिक्षक शिकारे, ठाणेदार सारंग नवलकार, पो.उपनिरिक्षक दिनकर गोरे, मंजुषा मोरे, पो.कमचारी विश्वनाथ राठोड, पोहेकॉ केशव मुळे, नापोकॉ नितीन जाधव, विजय किटे, शिवानंद केदार, रविंद्र दळवी, तळसीदास गुंजकर यांनी काम पाहले.