ग्रामिण रुग्णलयातील रुग्णांना फळ वाटप करुन साजरा केला बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस

0
693
Google search engine
Google search engine

संग्रामपुर / दयालसिंग चव्हाण:-

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त़आज दिनांक 10 मे रोजी संग्रामपुर तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये संग्रामपुर व वरवट बकाल येथील ग्रामिण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द़ महासभेचे जिल्हा़ध्य़क्ष़ भिमराव तायडे यांच्या उपस्थित तसेच भारिप बहुजन महासंघचे माजी तालुकाध्यक्ष रविंद्र भेलके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आले.

भारिप बमसंचे रविंद्र भेलके यांच्या हस्ते वरवट बकाल येथील ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. हयावेळी जेष्ठ़ नेते देविदास दामोधर ,माजी तालुकाध्यक्ष दशरथ सुरळकार ,युवा नेते शंकर पुरोहित,संजय इंगळे,भारत वानखडे,भाऊ भोजने,पं.स.सदस्या सौ.सविताताई खंडेराव,सौ.पुष्पाताई वानखडे,रवि पहुरकार,दिलीप वानखडे,हुसेन सुरत्ने ,महादेवराव गव्हांदे,ॲङ प्रमोद घाटे,डॉ.अनिल वानखडे,शेख आसिफ,सुर्यभान भिलंगे,बाबुराव सोनोने,प्रभाकर दामोधर,संदिप अवचार ,प्रविण सुभेदार ,सिध्दार्थ गव्हांदे,देविदास खंडेराव,ॲड कुरवाळे,नितीन गव्हांदे,उदेभान दांडगे,नागोराव इंगळे,गजानन भिलंगे, आदीसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा मोठया संख्येने भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.