फुले नगर पिण्याच्या पाण्यापासुन वर्षानुवर्षे वंचित ; भीम आर्मीचा आंदोलनाचा इशारा

0
819
Google search engine
Google search engine

बीड नितीन ढाकणे:

परळी येथील फुले नगर परिसरातील नागरीक गेली 30-40 वर्षांपासुन नळाच्या पिण्याच्या पाण्याच्या मुलभूत हक्कापासुन वंचित आहेत. ते मोंढया भागातून व इतरत्र ठिकाणाहून पिण्याच्या पाण्याच्या दोन घागरीसाठी महिला व बालकांना वणवण भटकावे लागत आहे. विशेेष बाब म्हणजे फुले नगर परिसरातून इतरत्र ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेलेली आहे. नगर परिषदेने यापूर्वीही लाखों रूपयांची उधळपट्टी केली आहे. पण अद्यापही पाण्याच्या मुलभूत हक्कापासुन का वंचित आहे असा सवाल भीम आर्मीचे शहर प्रमुख राम भोसले, रोहीत आदोडे, आकाश सावंत आदींनी निवेदनाद्वारे न.प. प्रशासनाला दि. 24/05/2018 रोजी केला आहे.

लवकरात लवकर फुले नगर परिसरात पाईप लाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा भीमआर्मीच्यावतीने तेथील नागरीकांना सोबत घेऊन हंडा, कळशी, टाकी, बकेट, ताब्यां घेऊन नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करून मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनास भाग पाडू असा इशारा भीम आर्मीचे शहर प्रमुख राम भोसले यांनी दिला आहे.