*प्रहार ने बेशरम चे झाड बँक ऑफ इंडिया च्या मॅनेजर ला दिले भेट*

0
1125
Google search engine
Google search engine

वर्धा :-
पुलगाव शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून ATM लिंक फेल दाखवल्या जाते. ATM मध्ये पैसे राहात नाही, ग्राहकांना खूप त्रास होतो, बँक मॅनेजर ला व कस्टमर केअर ला विचारले असता म्हणतात की, RBI कॅश देत नाही आहे, मग यांच्या पगार वाढिसाठी यांना आंदोलन किंवा बँका बंद ठेवता येते तर मग यांना बँकांमध्ये कॅश देत नाही तर बँका बंद का ठेवत नाही. आता मग कस्टमर ने कुठे जावं, म्हातारे लोकं लाईन मध्ये घंटो घंटो उभे राहतात, नोकरी वाले लोकांना नोकरी सोडून बँक मध्ये जावे लागते, तेथे पण मोजके पैसे मिळतात, तरुण मुलं पण लाइन मध्ये उभे आहेत आपल्या exam सोडून, बाकीचे काम सोडून, म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेशरम चे झाड बँक ऑफ इंडिया च्या मॅनेजर ला देऊन व ATM मशीन ला श्रद्धांजली वाहून हे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे पुलगाव देवळी विधानसभा प्रमुख राजेश सावरकर,शहर प्रमुख तुषार कोंडे, तालुका प्रमुख तुषार वाघ, जिल्हा उपाध्यक्ष महेश शाहू, अपंग क्रांती चे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सहारे,शहर उपाध्यक्ष प्रशिक ढोरे, महिला जिल्हाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सौ अरुणा रा सावरकर, महिला शहर प्रमुख रिनाताई श्रीखंडकर व कामगार सेनेचे प्रमुख जुबेर अहेमद यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडले.
यावेळी बँक मध्ये जे ग्राहक होते त्यांच्याशी पण संपर्क साधण्यात आला,यावेळी ग्राहकांमधून श्री अंबादे सर पण ग्राहकांच्या मधून बोलले आणि त्यांच्या समस्या त्यांनी पण बँक मॅनेजर समोर मांडल्या.
ही समस्या जर येत्या 8 दिवसात निकाली काढल्या गेली नाही तर तीव्र आंदोलन करू असे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.