देशातील बहुसंख्यांक हिंदूंना संविधानिक संरक्षण मिळण्यासाठी हिंदु संघटनांचे अधिवेशन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

0
514
Google search engine
Google search engine

 

भारतात बहुसंख्यांक समुदायाच्या शीर्षस्थ नेत्यांना एकत्रित येण्यास कायदेशीर बंदी आहे का याचे उत्तर ‘नाही’ असे असतांना मग असे प्रश्‍न का उत्पन्न होतात याचे एकमेव कारण म्हणजे भारतात बहुसंख्यांकांच्या सनातन धर्माला संविधानिक संरक्षण नाही त्यामुळेच आज कोणीही उठतो आणि हिंदूंना अपराधी ठरवण्याचा प्रयत्न करतोजगातील सर्व देशांमध्ये त्यांच्या संविधानाद्वारे तेथील बहुसंख्यांकांचा धर्मसंस्कृती,भाषा आणि हित यांना संरक्षण देण्यात आले आहे.भारत हा एकमात्र देश आहे कीजेथे बहुसंख्य असूनही हिंदूंना संविधानाद्वारे कुठलेही संरक्षण देण्यात आलेले नाहीउलट भारतीय संविधानाने अल्पसंख्यांकांचे पंथसंस्कृतीभाषा आणि हित यांना संरक्षण दिले आहेहे संविधानाच्या समतेच्या तत्त्वाच्या (म्हणजे ‘लॉ ऑफ इक्वॅलिटी’च्या)विरोधात आहेभारतात बहुसंख्यांक हिंदूंचा धर्म,संस्कृतीभाषा अन् हित यांना संवैधानिक संरक्षण मिळावेयासाठीच हिंदु संघटनांचे हे अधिवेशन आहेअसे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.